येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान / भाग-2 / धडा-11

 धडा 11.येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. नवीन करारात पुनरुत्थानाचा 104 वेळा उल्लेख केला आहे.आणि हा पवित्र शास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे.  ख्रिश्चन हा एकमेव धर्म आहे.ज्याचा प्रवर्तक प्रारंभकर्ता जिवंत आहे. 

1. पुनरुत्थानाचा पुरावा.

1. रिकामी कबर. मतय 28 अध्याय 6 वचन;  लूक 24 वा अध्याय 3वचन.

2. देवदूतांची साक्ष. मतय 28 वा अध्याय 46 वचन. लूक 24 वा अध्याय 5 ते 7 वचन. 

3. पुनरुत्थानानंतर लोक त्याच्याशी बोलले. पेत्र , मरीया, फिलिप आणि थोमा.  

4. येशूने खाल्ले, प्याले आणि त्याच्या जखमा दाखवल्या

 5. एका वेळी 500 लोकांनी त्याला  पाहिले.  1 करिंथ 15 वा अध्याय 6 वचन. 

6. जेव्हा स्तेफन शहीद होत होता. तेव्हा त्याने येशूला पाहिले. प्रेषितांची कृत्ये 7 वा अध्याय 56 वचन. 

7. पौलाने येशूला दिमिष्का जाताना पाहिले. प्रेषितांची कृत्ये 9 वा अध्याय 5 वचन.

8. लाखो लोकांनी साक्ष दिली आहे की तो जिवंत आहे. तारणहार आहे. 

 9. आणि अनेक अतुलनीय पुरावे. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय  3 वचन.

2. त्याचे पुनरुत्थान झालेले शरीर कसे होते

1. त्याला मांस आणि हाडे होते. लूक 24 वा अध्याय 39वचन.

2. ते एक गौरवशाली शरीर होते.  फिलिप्पै 3 अध्याय 21 वचन.

3. ते अमर शरीर होते, जे कधीही मरू शकत नाही. रोम 6 वा अध्याय 9 वचन. 

4. ते आध्यात्मिक शरीर होते.1 करिंथ 15 वा अध्याय 44 वचन. 

उपसंहार. आज आपल्याला पराभूत अस्वस्थ करणारी सर्वात भयानक गोष्ट म्हणजे मृत्यू.  परंतु पुनरुत्थान ही त्यापेक्षा मोठी शक्ती आहे, कारण ती कबरेची शक्ती पूर्णपणे मोडून टाकते.




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form