आध्यात्मिक बाळपणा
बधूंनो, आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.📖1 करिं 3:1मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.📖1 करिं 3:2
तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?📖1 करिं 3:3
तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.📖1 तीम 3:6
त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.📖1 तीम 3:7
आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात.📖इब्री 5:12
कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे.📖इब्री 5:13
परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.📖इब्री 5:14
✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝
आध्यात्मिक पोरपणा
माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत.📖गल 4:19जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.📖1 करिं 13:11
माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.📖1 योहा 2:1
प्रिय मुलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झालेली आहे.📖1 योहा 2:12
वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्यास तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो, मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता.📖1 योहा 2:13
म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.📖1 योहा 2:28
मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे.📖1 योहा 2:18
प्रिय मुलांनो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे.📖1 योहा 3:7
माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.📖1 योहा 4:4
मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे.📖इफि 6:1
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.📖कल 3:20
कारण पिता जसा मरण पावलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.📖योहा 5:21
✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝
आध्यात्मिक तरूणपणा
म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.📖2 करिं 4:16हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.📖स्तोत्र 103:1-5
तरुण लोकही थकतात आणि दमतात, आणि तरुण माणसे अडखळतात आणि पडतात.📖यश 40:30
जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.📖स्तोत्र 92:13-14
पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.📖2 तीम 2:22
देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.📖प्रेषि 2:17
वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.📖1 योहा 2:14
मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.📖1 करिं 3:2
बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.📖1 करिं 14:20
परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.📖इब्री 5:14
वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्यास तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो, मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.📖1 योहा 2:13-14
✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝✝
आध्यात्मिक आई-वडील पणा
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे📖याको 5:14माझ्या मुलांनो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत. ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे.📖गल 4:19-20
कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे. यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.📖1 करिं 4:15-16
वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्यास तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो, मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.📖1 योहा 2:13-14
तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल? किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल?📖मत्तय 7:9-10
बघा, मी तिसर्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे. मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्व खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?📖2 करिं 12:14-15
माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.📖3 योहा 1:4
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.📖इफि 6:4
आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा. प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.📖1 तीम 3:4, 12
तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हास केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास तयार होतो.📖1 थेस्स 2:7-8