प्रार्थना मुळे दोन भाऊ विरोध असणारे एकत्र येतात
एसाव आणि याकोब जुळे होते पण दिसायला आणि स्वभावाने खूप वेगळे होते. ते गर्भाशयात आणि जन्मानंतर बाहेर एकत्र वाढले. पण जेष्ठत्वाचा हक्क आणि आशीर्वादाने त्यांना वेगळे केले. दोन दशकांनंतर याकोबाला ज्याने आपल्या भावाचा हक्क बळकावला होता त्याला एसावाला पुन्हा भेटण्याचा प्रसंग आला . एसावाला भेटण्यासाठी त्याने काळजीपूर्वक तयारी केली. एसाव ४०० माणसांसह त्याला भेटायला येत होता (उत्पत्ति ३२). तेव्हा त्याने एसावाला पुढे भेटवस्तू पाठवल्या . मग त्याने त्याच्या बरोबर असलेल्या लोकांना दोन गटात विभागले. याकोबाने या भेटीसाठी रात्रभर प्रार्थना केली.
एसावाला पाहून याकोब पुढे गेला आणि त्याने जमिनीवर लोटांगण घातले. पण एसाव याकोबला भेटायला धावला आणि त्याने आपल्या भावाला मिठी मारली. त्याने आपल्या भावाच्या गळ्यात हात घातला आणि त्याचे चुंबन घेतले. आणि दोघे भाऊ रडले (उत्पत्ति ३३:३,४). सर्व द्वेष, वैरभाव, सूड आणि वाईट भावना वितळल्या. देवाने समेट घडवून आणला. जेव्हा खरा पश्चात्ताप होतो तेव्हा देव बरे करतो आणि संबंध पुनर्संचयित करतो. दोन्ही भावांनी समेट केला आणि शांततेने वेगळे झाले (उत्पत्ति ३३:१६). कधी कधी सलोख्याचा परिणाम विभक्त होण्यात होतो.
