पेरणारा
तुम्ही आपला कान द्या , आणि माझ्याकडे या ; ऐका , म्हणजे तुमचा जीव वाचेल. 📖यशया 55:3 वचन. प्रभु येशू म्हणाला. पेरणारा आपले बी पेरायाला निघाला आणि तो पेरीत असता काही बीं वाटेवर पडले , आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले . आणि काही खडकाळीवर पडले , आणि ते ऊगवल्यावर वाळून गेले , कारण त्याला ओलावा नव्हता. आणि काही कांटेरी झाडांमध्ये पडले , आणि कांटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून ते गुदमरविले आणि काही चांगल्या जमिनीवर पडले , आणि ते उगवून त्याला शंभरपट पीक आले. बीं हे देवाचे वचन आहे. आणि जे वाटेवरचे ते ऐक णारे आहेत. पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरुन तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःक रणातून वचन काढून घेतो. आणि जे खडकाळीवरचे ते जेव्हां ऐकतात तेव्हां वचन आनंदाने घेतात. पण त्यांना मूळ नाही ते काही वेळपर्यंत विश्वास घरतात, व परी क्षेच्या वेळी बाजूला पडतात. आणि कांटेरी झाडांमध्ये पडणारे बीं हे ऐकणारे आहेत. पण पुढे जाता जाता चितां व धन व हया आयुष्यांतली सुखे यांनी गुदमरुन जातात , व भरदार पीक देत नाहीत. पण चांगल्या जमिनीत पडणारे बीं हे असे आहेत , की ते वचन ऐकून तें भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात , आणि धीराने पीक देत जातात. 📖लूक 8:5-8,11-15,
प्रभु येशू म्हणाला.जो माझे वचन एकतो व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकालचे जीवन आहे, आणि तो न्यायात येणार नाही परंतू तो मरणातून जीवनात पार गेला आहे. 📖योहान 5:24 वचन.
