प्रेषित फिलिप ( मिशनरी जीवन चरित्र ) 3.

  प्रेषित फिलिप  ( मिशनरी जीवन चरित्र  ) 


प्रेषित फिलिप , येशू ख्रिस्ताच्या बारा शिष्यापैकी एक होते . ते गालीलाच्या समुद्राजवळील बे गावातून होते . ते ज्यू धर्मग्रंथात पारंगत होते . जेव्हा येशूने फिलिपाला त्यांच्या मागे जाण्यास सांगितले तेव्हा ते त्वरित येशूला ओळखले कि मोशे व इतर संदेष्ट्यांनी ज्याच्याविषयी भविष्यवाणी केली आहे ते हेच आहेत . असे म्हणू शकतो की ते पहिला शुभवार्ताउपदेशक होते . ते ताबडतोब आपला मित्र नथनेलकडे गेले आणि येशूला भेटायला त्याना बोलवले . अशा प्रकारे , येशूकडे आणखी एक प्रेषित आणण्यात त्याने सक्रिय भूमिका बजावली . ख्रिस्ताच्या सर्व शिष्यापैकी फिलिप सर्वात जास्त पोचण्यायोग्य व्यक्ती असल्याचे दिसते . जेरुसलेममध्ये सणाच्या वेळी उपासनेसाठी आलेल्या ग्रीक लोक फिलिपाकडे गेले आणि म्हणाले , श्रीमान , आम्ही येशूला भेटायला इच्छितो . योहानाच्या पाच हजारांच्या आहाराच्या अहवालावरून पवित्र शास्त्र अभ्यासक असे अनुमान लावतात की कदाचित त्यांच्या सेवकाई प्रवासात येशू आणि त्यांच्या शिष्यांना भोजन देण्याची जबाबदारी फिलिपकडे असावी . पवित्र शास्त्र मध्ये असे लिहिलेले आहे की शेवटच्या जेवणाच्या वेळी फिलिप येशूला विचारतात , “ प्रभु , आम्हास पिता दाखवा , ते आपल्यासाठी पुरेसे आहे . ” ( योहाना १४ : ८ ) त्याच्या विनंतीने आश्चर्यचकित होऊन ते उत्तरले , " फिलिपा , मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना सुद्धा तू मला ओळखले नाहीस काय ? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे . ( योहानाच्या १४ : ९ ) यावरून असे दिसून येते की ख्रिस्ताविषयीचे त्याचे सुस्वातीस ज्ञान मर्यादित असले तरी हळू हळू त्याना पूर्ण सत्य कळले . पेन्टेकॉस्ट येथे उर्वरित शिष्यांसह पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्याने केलेल्या सेवेतून हे स्पष्ट होते . परंपरेनुसार फिलिपने सिथिया ( मध्य युरेसियातील एक प्रदेश ) , सिरिया आणि फ्रेगिया ( तुर्की ) येथे सुवार्तेचा उपदेश केले . मंडळीच्या इतिहासानुसार फिलिपला दगडमार करून ठार मारण्यात आले असा विश्वास आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form