पॅट्रिशिया सेंट जॉन { मिशनरी जीवन चरित्र }
पॅट्रिशिया सेंट जॉन , मोरोक्कोमधील एक मिशनरी परिचारिका होती , जी तिच्या सुप्रसिद्ध इव्हान्जेलिकल लेखनासाठी देखील ओळखली जात असे . पेट्रिशियाचे पालक दक्षिण अमेरिकेतील मिशनरी होते जे 1919 मध्ये इंग्लंडला परतले . ईश्वरी वातावरणात वाढलेल्या पॅट्रिशियाला लहानपणापासूनच मिशनरी सेवकाईकडे ओढ होती . अगदी लहान वयातच , पॅट्रिशियाला येशू ख्रिस्ताबद्दल इतरांना सांगण्याचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता समजली . दुसऱ्या महायुद्धात पॅट्रिशियाने लंडनमध्ये परिचारिका म्हणून काम केले . त्यांच्या भावाच्या मोरोक्कोच्या वैद्यकीय मिशनरी सेवेत त्यांना सामील होण्यासाठी आमंत्रित केल्यावर , पॅट्रिशिया टँगियर्स येथे पोहोचली . तेथे त्यांनी स्थानिक मुस्लिम लोकांच्या अत्यंत वैमनस्यतेखाली काम केले . मुस्लिम महिलांना पुरुष डॉक्टर भेटण्याची परवानगी नव्हती ; म्हणूनच , या महिलांची सेवा करण्यासाठी पॅट्रिशियाने स्वतःचे घर क्लिनिक म्हणून वापरले . लवकरच त्यांनी स्थानिक महिलांचा विश्वासच मिळवला नाही तर त्यापैकी बऱ्याच जणांना ख्रिस्तासाठीही मिळवून दिले . जेव्हा मुस्लिमांना दिसले की आपले स्वतःचे लोक ख्रिस्ताला स्वीकारत आहेत , तेव्हा त्यांनी त्यांना धमकावले आणि त्यांना तेथून जाण्यास सांगितले . तर त्या रवांडाला जाऊन हिच सेवा करत राहिल्या . तथापि , काही काळानंतर त्या टॅगियर्समध्ये परत आल्या आणि नर्सिंग प्रशिक्षण शाळा स्थापन केली . खरा ख्रिस्ती ख्रिस्ताची साक्ष न देता निष्क्रिय राहू शकत नाही आणि पेट्रीसियासुद्धा हे करू शकल्या नाही . म्हणूनच , मोरोक्को सरकारने त्यांच्या भावाची रुग्णालय आणि त्यांची नर्सिंग संस्था दोन्ही ताब्यात घेऊन त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला . मोरोक्कोमध्ये 27 वर्षे सेवा केल्यानंतर पॅट्रिशिया 1975 मध्ये इंग्लंडला परतल्या . नंतर त्या बिस्त व इथिओपियाच्या काही भागांत गेल्या आणि शेवटपर्यंत गरीब व उपासमार लोकांची सेवा केली . पॅट्रिशिया ह्या एक विपुल कथाकार होत्या . त्यांनी आपल्या दैनंदिन अनुभवांचा उपयोग लहान मुलांसाठी आणि तरुणांना देवाचे प्रेम आणि सामर्थ्य देण्यासाठी सांगितले . मिशनरी सेवेदरम्यानही , त्यांनी पाळकांच्या अभावामुळे नव्याने जन्माला आलेल्या विश्वासणाऱ्यांच्या आध्यात्मिकतेवर परिणाम होऊ दिला नाही . त्यांनी स्वतः बायबलमधील सत्य अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकवले . ' ट्रेझर्स ऑफ द स्रो ' आणि ' द टेंगलवुड्स ' सिक्रेट ' या सारख्या त्यांच्या पुस्तकांनी अनेक मुलांना ख्रिस्ताकडे आणले आहे .
