विषय : परमेश्वराच्या घरात कोण राहू शकतो 🤔?


विषय : परमेश्वराच्या घरात कोण राहू शकतो 🤔? 


1.हे परमेश्वरा , तुझ्या मंडपात कोण वस्ती करील ? तुझ्या पवित्र डोगरावर कोण राहील ? 

2.जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो , मनापासून सत्य बोलतो. 

3.आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही. आपल्या शेजाऱ्याची निदा करीत नाही.

4.अधर्माला तुच्छ लेखितो. परमेश्वराचें भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करितो , आपण वाहिलेल्या शपथेने स्वत:चें अहित झालें तरी ती मोडीत नाही. 

5.आपला पैसा वाढीदिढीला लावीत नाही. निरपराध्यांची हानि करण्याकरिता लांच घेत नाही, तो, जो असा वागतो तो कधी उळणार नाहीं

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form