विषय : बायबल का वाचावे 🤔?
7.परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे . ते मनाचे पुनरुज्जीवन करितें, परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे . तो भोळ्यांस समंजस करितो 8.परमेश्वराचे विधि सरळ आहेत , ते हृदयाला आनंदित करितात परमेश्वराची आज्ञा चोख आहे , ती नेत्रांना प्रकाश देते
9.परमेश्वराचें भय शुद्ध आहे . तें सर्वकाळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत , ते सर्वथैव न्याय्य आहेत ;
10.ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत , ते मधापेक्षां , मोहोळांतून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत .
11.शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो ; ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ति होते .
