पिढ्यानपिढ्या शाप तोडण्याबद्दल बायबल काय म्हणते
पिढ्यांचा शाप" बायबलमध्ये अनेक ठिकाणी नमूद केला आहे. निर्गम 20:5, 34:7, गणना 14:18,अनुवाद 5:9 मुलांना त्यांच्या पूर्वजांच्या पापांची शिक्षा देणे देवाला अयोग्य वाटते. तथापि, याकडे पाहणे म्हणजे सांसारिक दृष्टीकोनातून पाहणे होय. देव जाणतो की पापाचे परिणाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. जेव्हा वडील पापी जीवनशैली जगतात तेव्हा त्यांच्या मुलांचीही, अशीच पापी जीवनशैली असते. म्हणूनच तिसर्या किंवा चौथ्या पिढीपर्यंत पापाची शिक्षा देणे देवासाठी चुकीचे नाही, कारण त्यांच्या पूर्वजांनी जे पाप केले तेच ते करत आहेत. पण त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या पापांची नव्हे तर त्यांच्याच, पापांची शिक्षा दिली जात आहे. बायबल आपल्याला विशेषतः सांगते, की देव मुलांना त्यांच्या पालकांच्या पापासाठी जबाबदार धरत नाही, अनुवाद 24:16
आजही मंडळीमध्ये एक प्रचलन आढळतो, ज्यामध्ये पिढ्यान्पिढ्या शापांना दोष दिले जाते, किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या आणि पापासाठी दोष दिला जातो. ते बायबलसंबंधी नाही. पिढ्यांच्या शापावर उपाय म्हणजे येशू ख्रिस्ताने दिलेला मोक्ष होय. जेव्हा आपण ख्रिस्ती बनतो, तेव्हा आपण नवीन उत्पत्ति बनतो, 2 करिंथ 5:17 मग देवाचे मूल अजूनही देवाच्या शापाखाली कसे राहू शकते , रोम 8:1 "पिढ्यांचा शाप" वरचा इलाज म्हणजे, मग ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, आणि त्याच्यासाठी पवित्र वेगळे जीवन जगणे, रोम 12:1-2
