कवच - कुंपण - छावणी - कोट - बरोबर

 कवच - कुंपण - छावणी - कोट - बरोबर 


कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस. 📙स्तोत्रसंहिता 5:12👇




तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? 📘ईयोब 1:10👇



परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. 📗स्तोत्रसंहिता 34:7👇



परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.📕जखर्‍या 2:5👇



जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. 📔मत्तय 28:20👇



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form