विजय मिळवणे व बक्षीस
प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
📖1 योहान 5:4
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम🙏
प्रियानो... आपण येशू ख्रिस्ताला स्वीकार केले. तेव्हा पासून आपण देवाचे लेकरे झालो. आणि एक महत्त्वाचे म्हणजे आपण युध्दात उतरलो आहे. म्हणून युद्धात उतरलो म्हणजे, कधी सतावणी,छळ, निंदा, गरीबी, दु:ख, किंवा असे बरेच कारणे असतील त्याच्या बरोबर युद्ध करणे आहे. पण प्रियानो आपण या पृथ्वीवर असा कारणाबरोबर युद्ध केले तर आपल्याला त्याचे प्रतिफळ मिळणार आहे. पाहू वचनाद्वारे काय मिळणार
1. 📖प्रकटीकरण 2:7 जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
2. 📖प्रकटीकरण 2:11 जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.
3.📖 प्रकटीकरण 2:17 जो विजय मिळवतो त्यास मी गुप्त ठेवलेल्या स्वर्गीय्य भोजन म्हणजे मान्न्यातून काही देईन. मी त्यास पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल, ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.
4. 📖 प्रकटीकरण 2:26 जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्यास मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
5. 📖 प्रकटीकरण 3 :5 जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
6. 📖 प्रकटीकरण 3 :12 जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
7. 📖 प्रकटीकरण 21 : 7 जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.
प्रियानो आपण पाहिजे की आपण या जगात असताना युद्ध करावे लागतील, आणि हो आपण युध्दात जिंकलो किंवा विजय मिळवला तर हे सर्व बक्षीस मिळणार आहे. मग तयार राहा या जगातील गोष्टी वस्तू बरोबर युद्ध करण्यासाठी व विजय मिळवा बक्षीस घ्या
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने भरपूर शांती तुम्हास मिळो आमेन..