धडा 20. विश्वास
1. सुरफुनीकी स्त्री चा विस्वास दृढ होता. मार्क 7 वा 26 वचन.
2. शताधिपतीने नम्र विश्वास दाखवला. मतय 8 वा अध्याय 8 ते 10 वचन.
3. आंधळ्याने गाढ विश्वास दाखवला. मार्क 10 वा 51 वचन.
1. विश्वासाची व्याख्या.
1. विश्वास म्हणजे भरोसा, निष्ठा, प्रामाणिक आणि वफादार असणे.इब्री 11 वा अध्याय 1 वचन. विश्वास जो मनुष्याला वाचवतो तो प्रभु येशूवरील वैयक्तिक विश्वास आहे.
2. मोक्षाच्या संदर्भात दोन प्रकारच्या समजुती आहेत.
अ. बौद्धिक विश्वास. ख्रिस्ताच्या इतिहासाचे ज्ञान आणि सर्वसाधारणपणे बायबलचा स्वीकार.
ब. सदसद्विवेक श्रध्दाअंतःकरणातून येणारा विश्वास हाच माणसाला त्याच्या श्रद्धेनुसार वागायला लावतो. ख्रिस्तावर खरा विश्वास तोच आहे. जो त्याला जीवनात स्वीकारतो. योहान 1 अध्याय 12 वचन. आणि कलस्सै 2 अध्याय 6 वचन. केवळ ज्ञान किंवा केवळ संमती/स्वीकृती ही खरी श्रद्धा नाही; खऱ्या विश्वासामध्ये आत्मसात करणे समाविष्ट आहे.
2. विश्वासाचे काही परिणाम.
1. आपण विश्वासाने वाचतो. उत्पत्ती 15 वा अध्याय 6 वचन ; रोम 5 वा अध्याय 1 वचन; गलती 3 अध्याय 26 वचन. 2. आम्ही विश्वासाने पवित्र झालो आहोत. प्रेषितांची कृत्ये 26 वा अध्याय 18 वचन.
3. विश्वासाने जीवनात शांती, सांत्वन आणि आनंद आहे. यशया 26 वा अध्याय 3 वचन ; फिलिप्पै 4 अध्याय 6 वचन; इब्री 4 वा अध्याय 1 ते 3 वचन; 1 पेत्र 1 अध्याय 5 वचन.
4. विश्वासाने आपण देवासाठी महान गोष्टी करू शकतो. इब्री 11 वा अध्याय 32 ते 40 वचन ; मतय 21 वा अध्याय 21 वचन; योहान 14 वा अध्याय 12 वचन. चर्चा.आपण पाहिलेली बौद्धिक आणि विवेकपूर्ण विश्वासाची उदाहरणे द्या.
