“बायबल” बद्दल माहिती

 बायबल” बद्दल माहिती

बायबल हे एक इस्राएली पुस्तक/पवित्र ग्रंथ आहे.

बायबल -हिब्रू शब्द – “तनाखब्रीत खद्शा”

बायबल या ग्रीक शब्दाचा अर्थ  पुस्तके” असा होतो. हा शब्द ‘पवित्र शास्त्र’ संबोधण्यासाठी वापरला जातो.

या शास्त्रामध्ये ६६ पुस्तके असून, विविध विषयानुसार त्याचे विविध भागांमध्ये, ग्रंथामध्ये विभाजन केले आहे, जसे – नियमशास्त्र, इतिहास, संदेष्ट्ये, शुभवर्तमान, पत्रे, भविष्यवाद

बायबलमधील भविष्यवाद हा बायबलच्या ‘विश्वासुपणाचा’ खूप मोठा पुरावा आहे.

बायबलमध्ये इस्राएल विषयी व इस्राएल मध्यवर्ती ठेवून जगाबद्दल भविष्यकथन केले आहे. देव जो निर्माता व मानव जो निर्मिती यातील नाते व देवाच्या योजना लिहिल्या आहेत.

बायबलचा सर्वात मुख्य विषय ‘एक व्यक्ती’ आहे, ती म्हणजे “इस्राएलचा मशीहा येशुवा- येशू ख्रिस्त” की, ज्याद्वारे सर्व जगाला तारण प्राप्त होऊ शकते. बायबलमधील सर्व भविष्यवाद हा येशू ख्रिस्ताकडे घेऊन जातो.

अनेक उदाहरणापैकी, बायबलमधील भविष्यवादाचे  आपल्या डोळ्यांसमोर घडणारे एक उदाहरण

पहिले व दुसरे मंदिर पाडल्यानंतर व बाबेल, रोमी इ. स्वाऱ्या झाल्यावर जगभर विखुरलेले इस्राएली, यहूदी लोक पुन्हा आपल्या पवित्र भूमी मध्ये येऊ लागतील व त्यांचे पुन्हा राष्ट्र निर्माण होईल.

संदर्भ- 1) होशेय ३, ६, 2) यहेज्केल २०,२६, ३५, ४५ 3) यशया ११,४३,६६ 4) यिर्मया ३१,३२ 5) सफन्या ३

सर्व संदेष्ट्ये ख्रिस्तपूर्व होते.

आपण पाहातो की, आज (१९४८) इस्राएल आपल्या पुढे उभे आहे व १९६७ ला यरुशलेम देखील युद्ध जिंकून चमत्कारिकरित्या परत मिळविले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form