भाग 5. तारणाचा सिद्धांत.
1. पश्चात्तापाची व्याख्या.
1. नकारात्मक. याचा अर्थ केवळ पापासाठी शोक करणे असा नाही. यहूदा इस्कार्योत आणि एसाव. इब्री 12 वा अध्याय 17 वचन. त्यांच्या पापाबद्दल दुःखी झाले, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
2. सकारात्मक. हा मानसिक बदल आहे. ज्यामुळे वर्तनात बदल होतो. मतय 21वा अध्याय 28 चे 32 वचन.
2. पश्चात्तापाचे महत्त्व. आवश्यकता.
1. योहान बाप्तीष्मा देणाऱ्या संदेशाची मुख्य विषय पश्चात्ताप होता. मतय 3 अध्याय 1 आणि 2 वचन.
2. येशूने पश्चात्तापाचा उपदेश केला. मतय 4 वा अध्याय 17 वचन.
3. त्याने आपल्या शिष्यांना पश्चात्तापाचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. मार्क 6 वा अध्याय 12 वचन.
4. पेन्टेकॉस्टनंतर शिष्यांनी पश्चात्तापाचा उपदेश केला. प्रेषितांची कृते 2 अध्याय 38 वचन, 20 वा अध्याय 21 वचन.
5. सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी देवाची इच्छा आहे. कि, सर्व मानव पश्चाताप करावा. 2 पेत्र 3 9 वचन.
6. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने शाश्वत नरक शिक्षा मिळणार. लूक 13 वा अध्याय 3 वचन.
3. पश्चात्तापाचे परिणाम.
1. जेव्हा एक पापी पश्चात्ताप करतो तेव्हा सर्व स्वर्गात आनंद होतो. लूक 15 वा अध्याय 7 आणि 10 वचन.
2 पश्चात्तापामुळे क्षमा मिळते. यशया 55 वा अध्याय 7 वचन. आणि प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 19 वचन.
3. पश्चात्ताप करणार्याला पवित्र आत्म्याचे दान मिळते. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन.
सराव कार्ये. वरीलपैकी एक परिच्छेद वापरून प्रवचनाची रूपरेषा काढा