मोठी जेवणावळ
येशूबरोबर जेवायला बसणाऱ्यातील कोणी एकाने त्याला म्हटले, जो देवाच्या राज्यात भाकर खाईल तो आशीर्वादित आहे. पण त्याने त्याला म्हटले, कोणा एका माणसाने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली व पुष्कळांना बोलावले. मग जेवणाच्या वेळेस, आता सर्व काही तयार झाले आहे, या, असे बोलावलेल्यांना सांगायला त्याने आपला दास पाठवला. तेव्हा सगळे एकसारखे निमित्त सांगू लागले , पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, आणि ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा कर. आणखी दुसरा म्हणाला, मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत आणि मी त्यांची परीक्षा करायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा कर. आणखी दुसरा एक म्हणाला, मी बायको विवाहून घेतली आहे, आणि या कारणामूळे मला येता येत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला ह्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा घरधन्याने रागावून आपल्या दासाला सांगि तले, नगराच्या रस्त्यात व गल्लयात लवकर जा, आणि गोरगरिबांना व व्यंगांना व आंधळ्यांना व लंगड्यांनां इकडे आत आण नंतर तो दास म्हणाला. प्रभू , तू आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अजून जागा आहे . मग प्रभु त्या दासा ला म्हणाला, माझे घर भरावे म्हणून रस्त्यांमध्ये व कुं पणामध्ये जाऊन लोकांना आत यायला लाव. कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या बोलावलेल्या माणसांतून एकही माझ्या संध्याकाळच्या जेवणातले काही चाखणार नाही. 📖लूक 14:15-24
प्रभु येशूने म्हटलेः जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेव तो तो कधीही तान्हेला होणार नाही. जो माझ्याकडे येतो त्याला मी बाहेर टाकणारच नाही. 📖योहान 6: 35-37
