दहा कुमारी || 11 ||

 दहा कुमारी


यामुळे तुम्हीही तयार व्हा , कारण तुम्हांला वाटत नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येत आहे. 📖मत्तय 24:43

तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे होईल; त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. आणि त्यातल्या पांच चूर्ख होत्या व पांच शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर तेल घेतले नाही; परंतु शहाण्यांनी आपल्या मशाली बरोबर आपल्या भांड्यामध्ये तेल घेतले. मग वर उशीर लावीत असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोंप लागली. मग मध्यरात्री अशी हांक झाली की. पाहा, वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारींनी उठून आपल्या मशाली नीट केल्या. आणि मूर्ख कुमारींनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हांला काही द्या, कारण आमच्या मशाली विझत चालल्या आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, कदाचित आम्हांला व तुम्हांलाही तेल मुळाच पुरणार नाही तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या. आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारीही येऊन म्हणाल्या, हे प्रभू , प्रभु , आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हांला खचित सांगतो, मी तुम्हांला ओळखीत नाही. यास्तव जागे राहा कारण तो दिवस किंवा ती घटका तुम्हांला ठाऊक नाही. 📖मत्तय 25: 1-13


यहोवा सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधाः तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. 📖यशया 55:6 





Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form