क्षमा न करणारा दास
पेत्र येशूला म्हणाला, हे प्रभू, माझ्या भावाने किती वेळां माझ्याविरुद्ध पाप केल्यास मी त्याला क्षमा करु ?. सात वेळांपर्यंत काय ?. येशूने त्याला म्हटले, सात वेळांपर्यत, असे मी तुला म्हणत नाही, तर सातांच्या सत्तर वेळांपर्यंत. यास्तव स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याला आपल्या दासांपासून हिशोब घ्यावा असे वाटले. आणि तो हिशोब घेऊ लागला, तेव्हा पांच कोटी रुपयांच्या देणेदाराला त्याच्याकडे आणले. परंतु फेड करायला त्याच्याजवळ काही नसल्यामुळे त्याच्या धन्याने आज्ञा दिली की, त्याला आणि त्याची बायको व लेकरे यांना व जे काही त्याचे आहे ते विकावे व फेड करावी. यावरुन तो दास त्याच्या पायां पडून त्याला नमन करून म्हणाला, प्रभू , मला वागवून घे, म्हणजे मी तुझी सर्व फेड करीन . तेव्हा त्या दासाच्या धन्याला त्याचा कळवळा येऊन त्याने त्याला मोकळे केले, व त्याचे ते कर्ज सोडून दिले. परंतु हा दास बाहेर निघून गेल्यावर ज्याला याचे शंभर रुपये देणे होते. असा त्याच्या सोबतीच्या दासांतला एक, त्याला आढळला, तेव्हा हा त्याला धरुन त्याची नरडी आंवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणें आहे ते फेडून टाक. त्यावरुन ह्याच्या सोबतीचा दास ह्याच्या पायां पडून त्याला विनंती करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. तरी हा मान्य होईना, तर याने जाऊन तो ते कर्ज फेडीपर्यंत त्याला तुरुंगात घातले. मग ह्याने काय केले तें त्याच्या सोबतीच्या दासांनी पाहिले तेव्हा ते अतिशय दुःखी झाले, आणि त्यांनी येऊन झालेल्या सर्व गोष्टी आपल्या धन्याला उघड सांगितल्या. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला आपल्या जवळ बोलावले; व त्याला म्हटले अरे दुष्ट दासा, तू मला विनंती केली म्हणून मी ते सर्व कर्ज तुला सोडले. जशी मी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायाची नव्हती काय ?. आणि त्याच्या धन्याने रागे भरुन तो तें सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला दंड करणाऱ्यांचा हाती दिले. जर तुम्ही प्रत्येक आपल्या अंतःकरणापासून आपापल्या भावाला क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील बापही तुमच्याविषयी तसेच करील. 📖मत्तय 18:21-35
ख्रिस्ताने जशी तुमची क्षमा केली तशी तुम्हीही करा. 📖कलस्सै 3:13
