गर्विष्ठ मनुष्य आणि पश्चात्तापी मनुष्य || 9 ||

 गर्विष्ठ मनुष्य आणि पश्चात्तापी मनुष्य . 


आणखी आपण न्यायी आहो असा स्वतःविषयी भरवसा धरुन जे इतरांना तुच्छ मानीत होते अशा कित्येकांसही त्याने हा दाखला सांगितला. दोन मनुष्य प्रार्थना करायला वर देवळात गेले, एक परुशी आणि दुसरा जकातदार. परुश्याने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे, जी लुटारू, अन्यायी, व्याभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. आठवडयातून मी दोनदा उपास करतो, जे काही मला मिळते त्या सर्वांचा दहावा भाग मी देतो. आपल्या जकातदार तर दूर उभा राहून वर काशाकडे डोळे लावायला देखील धजेना. पण उरावर मारुन घेऊन म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हांला सांगतो, हा त्या दुसऱ्यापेक्षा न्यायी ठरून आपल्या घरी उतरून गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. 📖लूक 18:9-14


प्रभु येशूने म्हटले: मी न्यायीस बोलवायला आलो नाही, तर पाप्यांस पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे. 📖लूक 5:32 

देव गार्बेष्टांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकांस कृपेचे दान देतो. यास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हांस उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. 📖1 पेत्र 5:5-6 




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form