निष्फळ झाड || 8 ||

 निष्फळ झाड.

त्याच वेळेस कित्येक लोक तेथे हजर होते. त्यांनी त्याला ज्या गालीलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी सांगितले. तेव्हा त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले. या गालीलकरानी असे दुःख भोगले आहे, यावरून ते इतर सर्व गालीलकरांहून अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय?. मी तुम्हांला सांगतो, हे असे नाही, परंतु जर तुम्ही पश्चाताप करणार नाही तर तुम्ही सर्व त्यांच्या प्रमाणे नाश पावाल. किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्याकडून त्यांचा घात झाला, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हाला वाटते कांय?. मी तुम्हाल सांगतो, हे असे नाही. परंतु जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्ही सर्व त्यांच्या प्रमाणे नाश पावाल. तेव्हा त्याने हा दाखला सांगितला. 


कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले एक अंजीराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला, परंतु त्याला काहीच सापडले नाही. तेव्हा त्याने द्राक्षमळ्याची जोपासना करणाऱ्याला म्हटले, पाहा, मी ही तीन वर्षे या अंजीरावर फळ पाहायला येतो, आणि मला काहीच सांपडत नाही; ते तोडून टाक, उगीच याचा भार भूमीला का असावा?. तेव्हा त्याने त्याला उत्तर देउन म्हटले, प्रभू, यंदाही ते असू दे; म्हणजे मी त्याच्या भोंवती खणीन व खत घालीन; आणि यापुढे त्याने फळ दिले तर बरे; नाही तर तू ते तोडून टाकावे. 📖लूक 13:1-9 

प्रभु तुम्हांविषयी फार सहनशील आहे: कोणाचा नाश व्हावा असे तो इच्छीत नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छीतो. 📖2पेत्र 3:9 

कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालचे जीवन असावे. 📖योहान 3:16 



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form