उधळ्या मुलगा || 7 ||

 उधळ्या मुलगा


मी तुम्हांस अंगीकारीन  आणि मी तुमचा बाप होईन आणि तुम्ही माझे मुलगे आणि मुली व्हाल, असे सर्व सत्ताधारी प्रभु म्हणतो. 📖2करींथ 6:17-18 

 प्रभु येशू म्हणाला: कोणी एका माणसाला दोन मुलगे होते. त्यांच्यांतील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ति वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत तोंच धाकटा मुलगा सर्व काही जमा करुन दूर देशात गेला, आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. त्याने अवघे खचून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली; मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाश्याजवळ जाउन त्याचा आश्रय धरला; त्याने तर त्याला आपल्या देशात डुकरे चारायला पाठवले. तेव्हा डुकरे जी टरफलेखात असत त्यांनी तरी आपले पोट भरावे असे त्याला वाटत असे; आणि त्याला कोणी काही दिले नाही. नंतर तो शुद्धिवर येउन म्हणाला, माझ्या बापाच्या किती तरी मोलकऱ्यांना पुरून उरेलशी भरपूर भाकर आहे; आणि मी तर एथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बापा, मी आकाशाविरुद्ध व तुम्हासमोर पाप केले आहे; आता मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायला योग्य नाही, मला तू आपल्या एका मोलकन्यासारखा ठेव. मग तो उठून आपल्या बापाकडे आला. पण तो अजून दूर आहे इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला, आणि त्याने धांवत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मग मुलगा त्याला म्हणाला; बापा, मी स्वर्गाविरुध्द व तुझ्यासमोर पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायला योग्य नाही. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. मग पोसलेले मेंढरू आणून कापा, आणि आपण खाऊ व उल्लास करु; कारण हा माझा मुलगा मेलेला होता, आणि तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवलेला होता, आणि तो सांपडला आहे, मग ते उल्लास करू लागले. 📖लूक 15:11-24 


दुष्ट आपला मार्ग व अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देवो, आणि यहोवाकडे तो परत येवो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील, आणि आमच्या देवाकडे तो परत येवो, कारण तो उदंड क्षमा करील. 📖यशया 55:7 

तर तुमची पापे पुसून टाकाली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा. 📖प्रे. कृ. 3 :19



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form