हरवलेली अधेली
अशी कोण बाई आहे की, तिच्याजवळ दहा अधेल्या असता त्यांतून एक अधेली हरवली, तर ती दिवा लावून व घर झाडून ती सांपडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही?. मग तिला ती सांपडल्यावर ती आपल्या मैत्रिणींस व शेजारणीस एकत्र बोलावून म्हणते, जी अधेली हरवली होती ती मला सांपडली. म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे, मी तुम्हांस सांगतो पश्चाताप करणाच्या एका पापी मनुष्यामूळे देवाच्या दूतांसमोर आनंद होतो. 📖लूक 15:8-10
मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आला आहे. 📖लूक 19:10
