हरवलेले मेंढरूं. || 5 ||

 हरवलेले मेंढरूं. 


सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते. आणि परुशी व शास्त्रीही कुरकूर करीत होते; ते म्हणत होते, हा पाप्यांचा अंगीकार करतो व त्यांच्याबरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला  तो म्हणाला, तुमच्यातला असा कोण माणूस आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढरें असतां त्यातून एक हरवले तर ती नव्याण्णव रानात सोडून देऊन जे हरवलेले ते सांपडेपर्यंत तो त्याच्यामागे जात नाही ?. मग त्याला ते सापडल्यावर तो आनंद करीत ते आपल्या खांद्यावर घेतो आणि घरी आल्यावर तो आपल्या मित्रांना व शेजाऱ्याना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरु मला सांपडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे  ज्यांना पश्चातापाची गरज नाही नव्याण्णव न्यायी माणसांमुळे जो आनंद होतो त्यापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्यामुळे स्वर्गामध्ये अधिक आनंद होईल. 📖लूक 15:1-7


मीच चांगला मेंढपाळ आहे, जो चांगला मेंढपाळ तो आपला जीव मेंढरासाठी देतो. 📖योहान 10:11 




Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form