मूर्ख धनवान
तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हणाला , हे गुरु , मला वतनाचा वांटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग . तो त्याला म्हणाला , माणसा , मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वांटणी करणारा असे कोणी नेमले ?. तेंव्हा त्याने म्हटले , तुम्ही सावध असा , आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणांला राखा , कारण कोणाला उदंड वस्तु असणे यात त्याचे जीवन आहे असे नाही . आणि त्याने त्यांना दाखला सांगितला , तो म्हणाला , कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीने फार पीक दिले . तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला . तो म्हणाला , मी काय करू ? कारण माझी पिके सांठवायला मला जागा नाही . मग त्याने म्हटले , मी असे करीन , मी आपली कोठारे मोडून त्यांहून अधिक मोठी बांधीन , मग तेथे मी आपले सव धान्य व आपला माल सांठवीन आणि मी आपल्या जिवाला म्हणेन , हे जिवा , तुला पुष्कळ वर्षांपुरता पुष्कळ माल ठेवलेला आहे , तू विसावा घे , खा , पी , आनंदित राहा . परंतु देवाने त्याला म्हटले , अरे मूर्खा , याच रात्री तुझा जीव तुझ्याजवळून मागितला जाईल , तेव्हा ज्या वस्तु तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील ? जो आपल्यासाठी द्रव्य सांठवून ठेवतो व देवाविषयी धनवान नाही , तो असाच आहे . 📖लूक 12:13-21
पृथ्वीवर , जेथे कसर व जंग खाऊन टाकतात , आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात , तेथे तुम्ही आपणांकरिता संपत्ती सांठवून ठेवू नका.तर आकाशामध्ये , जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही , आणि जेथे चोर घर फोडीत नाहीत किंवा चोरीतही नाहीत , तेथे तुम्ही आंपणाकरिता संपत्ती सांठवां , कारण जेथे तुझी संपत्ती आहे तेथे तुझे चित्तही असणार. 📖मत्तय 6:19-21
आपण काय खावे आणि आपण काय प्यावे अशी आपल्या जिवाविषयी , किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करु नका ; अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही ? या सरांची गरज तुम्हांला आहे , हे तुमच्या आकाशातील बापाला ठाऊक आहे . तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायीपण मिळवायला झटा , म्हणजे त्यांवर हया सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील .📖 मत्तय 6:25,32-33
