चांगला शेजारी
कोणी एक नियमशास्त्री उभा राहिला , व त्याने त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हटले . हे गुरुजी सर्वकालचे जीवन हे वतन मिळण्यास मी काय करावे ?. मग तो त्याला म्हणाला . नियमशास्त्रात काय लिहिले आहे ?. तू काय वाचतोस ?. आणि त्याने उत्तर देउन म्हटले, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभु याच्यावर प्रीती कर , आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर . मग त्याने त्याला म्हटले , ठीक उत्तर दिलेस , हे कर म्हणजे तू वांचशील. पण त्याने आपणाला न्यायी ठरवण्याची इच्छा धरुन येशूला म्हटले, तर माझा शेजारी कोण ?. येशूने उत्तर देऊन म्हटले, कोणी एक माणूस यरुशलेमेहून खाली यरहोस जात होता. आणि तो लुटारुंमध्ये सांपडला. त्यानी त्याची वस्त्रे काढून घेतली आणि त्याला मारही दिला, आणि अर्धमेला सोडून ते निघून गेले. मग कोणी एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला.आणि तसाच कोणी लेवीही त्या ठीकाणी आल्या वर, त्याला पाहून दुसऱ्या बाजूने निघून गेला. मग कोणी एक शमरोनी प्रवास करीत असता तो होता तेथे आला, व त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला. आणि त्याने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर तेल व द्वाक्षारस ओतून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून एका उतारशाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. आणि दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या घरधन्याला दिले, आणि तो म्हणाला, याचा सांभाळ कर. आणि जे काही अधिक तू खर्चिंशील ते मी पुन्हा माघारी आल्यावर तुला भरून देईन. तर या तिघांतून कोणता लुटारुंमध्ये पडलेल्याचा शेजारी झाला असे तुला वाटते ?. तेव्हा तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो आणि येशूने त्याला म्हटले, तू जाऊन तसेच कर. 📖लूक 10: 25-37
तुझा देव परमेश्वर तुझ्यापाशी एवढेच मागतो की , तू परमेश्वर तुझा देव याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गात चालावे, आणि त्याच्यावर प्रीती करावी, आणि तू आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जिवाने परमेश्वर तुझा देव याची सेवा करावी, आणि परमेश्वराच्या आशा आणि नियम पाळावे.कारण परमेश्वर तुमचा देव , तो देवांचा देव व प्रभूंचा प्रभु , मोठा देव तो उपऱ्यावर प्रीती करतो व त्याला अन्नवस्त्र देतो . यास्तव तुम्ही उपऱ्यावर प्रीती करा. 📖अनुवाद 10:12 आणि 13:17-19
तुम्हीही, तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर , आम्ही निरुपयोगी दास आहो , जे आमचे कर्तव्य आम्ही करायचे होते तेच आम्ही केले आहे , असे म्हणा . 📖लूक 17: 10
