दोन बांधणारे
जे कलम लावलेले वचन तुमचे जीव तारायाला समर्थ आहे ते नम्रतेने अंगीकारा. 📖याकोबाचे पत्र 1:21 प्रभु येशू म्हणाला. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या प्रमाणे करतो तो कोणासारखा आहे , हे मी तुम्हाला दाखवतो. तो कोणी एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे ; त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला आणि पाण्याचा ओघ त्या घरावर आदळला, तरी त्याच्याने ते हालवले नाही; कारण ते चांगले बांधले होते. परंतु जो ऐकून त्याप्रमाणे करित नाही तो पायावांचून मातीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर पाण्याचा ओघ आदळला आणि ते पडलेच पडले, व त्या घराचा मोठा नाश झाला. 📖 लुक 6:47-49 तुम्ही कसे ऐकता याविषयी जपा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे. 📖लूक 8:18 ,11: 18
