द्राक्षमळ्याचे दुष्ट माळी.
बापाने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. 1योहान 4:14
प्रभु येशूने म्हटले कोणी घरधनी मनुष्य होता, त्याने द्राक्ष मळा लावला व त्याभोवती कुंपण घातले व त्यामध्ये द्राक्षारसाठी कुंड खणले व माळा बांधला; मग त्याने तो मळा शेतकऱ्यांस खंडाने सोंपून दिला आणि तो दुसऱ्या देशाला गेला. नंतर फळांचा हंगाम जवळ आला तेव्हा आपली फळे घेण्याकरिता त्याने आपल्या दासांस त्या शेतकन्यांकडे पाठवले. तेव्हा त्या शेतक - यांनी त्याच्या दासांस धरून एकाला ठोकले, व एकाला जिवे मारले, आणि एकाला धोंडमार केला. फिरुन त्याने पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले; त्यांनाही त्यानी तसेच केले. पण त्यानंतर त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले; तो म्हणाला, ते माझ्या मुलाचा मान राखतील. परंतु ते शेतकरी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा तर वारीस आहे, चला, आपण याला जिवे मारू व याचे
वतन घऊ . तेव्हा त्यांनी त्याला धरले, आणि त्याला द्राक्षमळयाच्या बाहेर काढून जिवे मारले. तर द्राक्षमळयाचा धनी जेव्हा येईल, तेव्हा तो त्या शेतकऱ्यांना काय करील ? ते त्याला म्हणाले, तो त्या वाईट माणसांचे हालहाल करुन त्यांचा नाश करील, आणि जे ती फळे हंगामी त्याला देत जातील अशा दुस ऱ्या शेतकऱ्यांना तो आपला द्राक्षमळा खंडाने सोंपून देईल. मत्तय 21:33-41
