नाकारला गेलेला आणि ठार मारला गेलेला प्रभु येशू ख्रिस्त. 14

 नाकारला गेलेला आणि ठार मारला गेलेला प्रभु येशू ख्रिस्त.


मुख्य याजक व लोकांचे वडील यांनी येशूला जिवें मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली . आणि त्यांनी त्याला बांधून नेले व सुभेदार पिलात याच्या हाती दिले. पिलाताने त्यानां म्हटले , तर येशू जो ख्रिस्त म्हटला आहे त्याचे मी काय करावे ? ते सर्वच म्हणाले, त्याला वधस्तंभी द्यावे. आणि तो म्हणाला , का ? त्याने काय वाईट केले ? परंतु ते फारच ओरडत राहून म्हणाले , त्याला वधस्तंभी द्यावे . मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याला वधस्तंभी देण्याकरिता नेले. मत्तय 27:1- 2 ,22-23,13 मग ते कवटी म्हटलेल्या जागी आले , तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी दिले. तेव्हा येशू म्हणाला , हे बापा , त्यांना क्षमा कर , कारण ते काय करतात हे त्यांना ठाऊक नाही . मी आाणि येशू मोठ्याने ओरडून म्हणाला , हे बापा , आपला आत्मा तुझ्या हातात सोंपवून देतो ; आणि असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.  लूक 23:33-34, 46 योसेफ नांवाचा एक चांगला व न्यायी असा मंत्रि सभेचा सभासद होता. ह्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले . मग त्याने ते खाली उतरून घेऊन तागाच्या वस्त्राने गुंडाळले व जिच्यात कोणाला कधी ठेवले नव्हते अशा खडकात खोदलेल्या कबरेत ते ठेवले. लूक 23:50,52-53 वचन,आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या भापण तयार केलेली सुगंधी द्रध्ये घेऊन कबरेकडे आल्या. तेव्हा धोंड कबरेवरुन लोटलेली आहे अशी त्यांना आढळली. आणि त्या आत गेल्या तरी प्रभु येशूचे शरीर त्यांना सापडले नाही . आणि असे झाले की त्याविषयी त्या भ्रांतीत पडल्या असता , पाहा लखलखीत वस्त्रे ल्यालेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि त्या भिऊन तोंड भूमीकडे करून लवल्या असता ते त्या ना म्हणाले , तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करिता ? तो येथे नाही तर उठला आहे.तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा. तो म्हणाला होता , मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती देण्यात यावा , व वधस्तंभी दिला जावा , व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा ऊठावे याचे अगत्य आहे.लूक 24:2-7 शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापावद्दल मरण पावला , आणि तो पुरला गेला , आणि शास्त्रले खाप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवला गेला.1करिथ 15:3-4


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form