मासे धरण्याचे जाळे.
प्रभु येशूने म्हटलेः स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या व सर्व प्रकारचे जीव गोळा करणाऱ्या एका जाळयासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्यावर ओढून आणले, आणि बसून जे चांगले ते भां ड्यात भरले , पण जे वाईट ते फेकून दिले. या काळा ल्या समाप्तीस तसेच होईल. देवदूत येतील ; आणि वाइटांना न्यायीच्या मधून छेदून काढतील, आणि त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील ; तेथे रडणे व दांत खाणे होईल. मत्तय 13:47-50
प्रेषित योहानाने लिहिले: मोठे पांढरे राजासन, आणि त्यावर तो बसलेला त्याला मी पाहिले मग मेलेले, लहान आणि थोर हे त्या राजा सनापुढे उभे राहिलेले मी पाहिले, आणि पुस्तके उघडण्यात आली, तेव्हा दुसरे पक पुस्तक, जे जीवनाचे आहे, तेही उघडण्यात आले; आणि त्या पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यांवरुन मेलेल्यांचां न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्मांप्रमाणे ठरवला गेला. आणि जो कोणी जीवनाच्या पुस्तकात लिहिलेला नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. प्रकटीकरण 20:11,12 ते 15
प्रभु येशूने म्हटले : मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला आला नाही, तर सेवा करायला व पुष्कळांच्या खंडणीकरितां आपला जीव द्यायला आला आहे. मार्क 10:45 माझ्या बापाची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वका लचे जीवन असावे: आणि शेवटल्या दिवशी मीच त्याला उठवीन. योहान 6: 40 मार्ग व सत्य व जीवन मीच आहे, कोणीही माझ्या मधून आल्यावांचून बापापाशी येत नाही. योहान 14:6 मीच दार आहे. जर कोणी माझ्यातून आंत जाईल तर त्याचे तारण होईल. योहान 10:9 चांगला मेंढपाळ मीच चांगला मेंढपाळ आहे; जो तो आपला जीव मेंढरासाठी देतो. योहान 10:11 अहो जे तुम्ही कष्टी व ओझ्याने लादलेले आहा, ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मत्तय 11:20