रॉबर्ट कॅल्डवेल [ मिशनरी जीवन चरित्र ]
रॉबर्ट कॅल्डवेलचा जन्म एका गरीब पण ईश्वरभीरू कुटुंबात झाला होता आणि ते नऊ वर्षाचा झाल्यापासून कामाला लागले . त्यांचे औपचारिक शिक्षण मर्यादित होते परंतु त्यांना लंडन मिशनरी सोसायटी ( एलएमएस ) मार्फत ग्लासगो विघापीठात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली . त्यांच्या नियुक्तीनंतर ते एलएमएसच्या वतीने १८३८ मध्ये मद्रास येथे आले . स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज ओळखून त्याने तामिळ भाषेत प्रभुत्व मिळवले आणि तेथील लोकांमध्ये सुवार्ता सांगण्यास सुरवात केली . नंतर ते एक प्रसिद्ध तमिळ अभ्यासक झाले आणि त्यांनी ' द्रविड भाषेचे तुलनात्मक व्याकरण ' लिहिले ज्यामुळे नंतरच्या सेवकांना शहराच्या या भागात सेवेची तयारी करण्यास मदत झाली . जी . यू . पोप आणि बेंजामिन शुल्टझ यांसारख्या सेवकांचा कॅल्डवेलवर फारच प्रभाव पडला आणि त्यांनी गरिबांच्या उन्नतीसाठी समर्पितपणे काम केले . १८७७ मध्ये तिरुनेलवेलीचा बिशप म्हणून त्यांच्या नेमणूक झाला , त्यानंतर त्यांनी लोकांचे जीवन बदलणारया अनेक मालिका हाती घेतल्या . त्यांनी शहरे आणि खेड्यांमध्ये शाळा स्थापन केली आणि अनेक उल्लेखनीय मंडळी स्थापन केले , त्यापैकी ईदांगुडी येथील होली ट्रिनिटी चर्च एक आहे . मूळ ख्रिस्ती सेवकांचा मदतीने त्याने गरिबांचे सुव्यवस्थित ख्रिस्ती समुदाय तयार करण्याची योजना विकसित केली . त्याची पत्नी , एलिझा ही त्याच्या सर्व सेवकाई कार्यात त्याचे सामर्थ्य व पाठबळ होती . शाळा - बांधकामासाठी आणि लेस उघोगांची स्थापना करण्यात आली जे स्थानिक समाजातील उत्पन्नाचा पूरक स्रोत म्हणून जिल्ह्यात त्यांनी केली . तामिळ लोकांशी कॅल्डवेलची ओळख असल्यामुळे त्याने त्याना बरीच प्रतिष्ठा मिळवून दिली . तथापि , ते आयुष्यभर एक साधा आणि नम्र माणूस राहिले आणि त्यांचा ज्या महान उद्देशासाठी बोलावण्यात आले होते त्यापासून ते कधीही निराश झाले नाही . ते त्यांच्या मेंढरांबद्दल प्रामाणिक , सहानुभूतीशील आणि जागरूक मेंढपाळ होते . आपल्या अपोस्टोलिक नम आणि उदाहरणाद्वारे , त्याने अनेक स्थानिक लोकांना सेवेसाठी प्रशिक्षण दिले . ख्रिस्ती लोकांची आणि अन्य लोकांची व्यक्तिमत्त्वात व स्थितीत झालेल्या सुधारणांमुळे त्याचे सेवाकार्य दिसून येते . अर्ध्या शतकाच्या श्रमानंतर , ते १८ ९ १ मध्ये प्रभूबरोबर राहण्यास गेले .
