श्रीमंत माणूस व धन संपती

 श्रीमंत माणूस व धन संपती

एक खूप मोठा श्रीमंत व्यक्ती विस्वासी होता. त्याच्याकडे बायको, मुले, पैसा, कार, बंगला होता. तो 70 वर्षांचा झाला आणि त्याला समजले आता मी मरणार आहे. तेव्हा तो फार चिंतेत पडला माझी सर्व संपत्ती, धन मी स्वर्गात घेऊन जायचा आहे पण कसे घेऊन जाऊ तेव्हा त्याच्या मनात एक योजना तयार केली. रेव्ह, बिशप, पास्टर, सेवक ह्याना तो घरी बोलवले व मनाला मला सर्व संपती धन स्वर्गात घेऊन जायचे कसे घेऊन जाऊ त्यांच्या जवळ बायबल ठेवले व बोलला, कारण तुम्ही बायबल चे ज्ञानी आहात, तेव्हा ते म्हणाले भाऊ हे जगीक धन संपत्ती घेऊन जाण्यासाठी मार्ग नाही. आम्हाला माफ असे बोलून निघून गेले, मग तो श्रीमंत व्यक्ती विज्ञानी लोकांना गोळा केले व त्यांना ही तसेच म्हणाला त्या विज्ञानी लोकांनी उत्तर मी तुमची संपती, धन मुले बायको आम्ही मंगळ ग्रह पर्यंत नेऊन देऊ पण तिथून पुढे नाही. नेऊन देवू शकत. माफ करा असे बोलून ते निघून गेले, मग तो व्यक्ति कारगीर लोकांना घेऊन आला त्यांना म्हणाला तुम्ही कारगीर आहात काही तोडमोड करू घेऊन जाऊ शकतो, ते ही म्हणाले आम्हाला माफ करा असे बोलून ते ही निघून गेले. मग तो व्यक्ति फार निराश झाला एक खाट, बाज घेऊन कडूनिंब च्या झाडाखाली बसला व विचार करत होता. इतक्यात त्याच्या जवळून एक शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन जात होता. तो त्या श्रीमंत व्यक्तीला म्हाणाला शेटजी तुम्ही का एवढे निराश का ?, तेव्हा सर्व हकीकत त्या शेतकरी ला सांगितली तेव्हा तो बस एवढीशी गोष्ट तर सोपे आहे. जे काही तुमच्याकडे संपती, धन ते गोरगरीब लोकांना द्या, स्वर्गात तुला संपती,धन मिळेल....... खरंच मित्रांनो येशूने म्हटले आहे. येशू त्याला म्हणाले, “जर सिद्ध व्‍हावयाचे असेल, तर जा आणि जे काही तुझ्याजवळ आहे ते गोरगरीबांना देऊन टाक; माझा शिष्य हो म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल.”🔰मत्तय 19:21

मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.🔰मत्तय 16:19

मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले.🔰मत्त 18:18

मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.🔰मत्त 25:40

प्रियानो अमेरिका मध्ये जायचे असेल तर पासपोर्ट लागतो व व तेथे डॉलर चालतो म्हणून जर अमेरिका ला जायचे आहे. तर भारतीय विमानतळावर आपला पासपोर्ट दाखवायला लागेल तेव्हा आपण जाऊ शकतो, व भारतीय रूपये विमानतळावर जमा करावे लागतील जेव्हा आपण अमेरिका ला गेलो तेथे आपल्याला डॉलर मिळतील... तर आपली संपती,धन देवाच्या सेवेसाठी, गोरगरीबासाठी, भुकेले, तहानेले, उघडी, विना घर, असणाऱ्याला मदत करा... व स्वर्गात संपती धन मिळवा... उदाहरण येशू पासपोर्ट आहे त्या शिवाय स्वर्गात जाऊ शकणार नाही, या जगाचे धन संपती घेऊन जाऊ शकत नाही. वरिल वचनाप्रमाणे केले तर स्वर्गात संपती मिळेल...... इयोब म्हणाला, “मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल.🔰ईयो 1:21


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form